| आमरण उपोषण आंदोलनाचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन |
(नेवासा प्रतिनिधी)- शनिशिंगणापूर देवस्थान मधील बनावट ॲप ॲप घोटाळ्यातील आरोपीवर प्रत्यक्ष कारवाई करा अन्यथा शनीशिंगणापूर येथे पुन्हा बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल असे निवेदन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
शनिशिंगणापूर येथील जगप्रसिद्ध शनैश्वर देवस्थानमधे बनावट ॲप, बनावट क्यू आर, बनावट देणगी पुस्तक यामाध्यमातून येथील पुजारी, कर्मचारी, अधिकारी यांनी केलेल्या करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराची तसेंच कामगार भर्तीसह इतरही घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले. पावसाळी अधिवेशनात तशी घोषणा देखील केली.ऑनलाईन घोटाळ्याची चौकशी पोलिसांच्या सायबर विभागातील पोलीस महासंचालक उच्चपदस्थ अधिकाऱ्यामार्फत तर इतर घोटाळ्याची चौकशी मुख्य धर्मदाय आयुक्त मुंबई कार्यालयामार्फत करण्याचे आदेश देण्यात आले.तपास यंत्रणाकडून पुजारी, कर्मचारी, मुख्य तक्रारदार यांची चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले, विश्वस्तातांची देखील वकिला मार्फत सुनावणी झाली. या घटनेस तब्बल दोन ते तीन महिन्याचा मोठा कालावधी उलटूनही अदयाप प्रत्यक्षरित्या कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे शनिभक्तांनी मोठी नाराजगी जाहीर केली. ज्या आवेशात सरकारने घोटाळ्याची चौकशी लावून पंढरपूर, शिर्डी याप्रमाणे शिंगणापूर देवस्थान सरकारी अमलाखाली आणून देवस्थानचा कारभार पारदर्शी करण्याचे सुतोवाच केले होते त्यास मोठा काळ उलटूनही घोटाळे बहाद्दरावर प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने देशभरातील शनिभक्तांसह, नेवासा तालुक्यातील नागरिक, प्रामाणिक कर्मचाऱ्याचा हिरमोड होऊन सरकार व सरकारी यंत्रणावरचा विश्वास उडाला आहे
शिंगणापूर देवस्थानमधील या घोटाळ्याचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे, यासाठी दोनवेळा आमरण उपोषण आंदोलन करणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी सरकारच्या बॉटचेप्या भूमिकेची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देवस्थानमधील घोटाळे बहाद्दरावर प्रत्यक्ष कारवाई करण्याची मागणी केली. तर तात्काळ कारवाईस सुरुवात न केल्यास शनिशिंगणापूर येथे पुन्हा हजारो शनिभक्तांसह आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी निवेदणाद्वारे दिला. यावेळी पोलीस अधीक्षक यानी लवकरच आठवडाभरात प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात करण्यात येईल असे स्पष्ट केले. निवेदनावेळी काँग्रेसचे संदीप मोटे, अंजुम पटेल, छावाचे रावसाहेब काळे, आदी उपस्थित होते.
न्यायाच्या देवतेला न्यायाची प्रतीक्षा करण्याची वेळ ढिसाळ चौकशी यंत्रणा व सरकारमुळे आली असून देशभरातील शनिभक्तांचा या यंत्रणावरचा विश्वास उडत चालला आहे. आम्ही हिम्मत न हारता शेवटपर्यंत मोठा लढा देणार आहोत व शनिभक्तांना न्याय मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ देणार नाही - मा. संभाजी माळवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
Post a Comment