High Court orders ED: मागच्या काही वर्षात ईडीकडून होणाऱ्या कारवायांना वेग मिळाल्याचे पाहायला मिळते. ज्याच्या विरोधात तक्रार असेल त्याला रात्री-अपरात्री कधीही ईडीचे अधिकारी ताब्यात घेतात किंवा थेट अटकही करतात. यावर आता सुप्रीम कोर्टाने कोर्टने ईडीला सुनावले आहे. 64 वर्षाच्या इसमाने केलेल्या याचिकेवर कोर्टाने उत्तर मागितले आहे. केंद्रीय एजन्सीकडून रात्रभर चौकशी झाली. काळवेळ न पाळता झालेल्या अटकेला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते. (राम कोटुमल इसरानी विरुद्ध प्रवर्तन निदेशालय आणि इतर) दरम्यान रात्री-अपरात्री कुणाला अटक करता येते का? यासंदर्भात स्पष्ट निर्देश किंवा पत्रक जारी करा असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
Post a Comment