Maratha Reservation: मराठा आरक्षण GR नंतर छगन भुजबळ यांनी पहिलं मोठं पाऊल उचललं; थेट मुख्यमंत्र्यांवर नाराजी?

 v

Chhagan Bhujbal News: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी नेते नाराज झाले असून मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. भुजबळ यांनी वांद्र्यात ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली असून सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याने ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढत राज्य सरकारने काल हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला. सरकारच्या या निर्णयानंतर जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांकडून जल्लोष केला जात असतानाच ओबीसी नेत्यांनी मात्र या निर्णयाविरोधात दंड थोपटले आहेत. सरकारने या निर्णयाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाच्या नरडीच्या घोट घेतला असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेली असतानाच आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही या निर्णयाविरोधात आपण दंड थोपटणार असल्याचे संकेत दिले आहेत. कारण छगन भुजबळ यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला. जरांगे पाटील यांच्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनावेळी त्यांचा छगन भुजबळ यांच्याशी जोरदार संघर्ष झाला होता. मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे आश्वस्त केल्यामुळे भुजबळ यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाबद्दल कोणतेही भाष्य करणे टाळले. परंतु आता सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढल्यामुळे मराठ्यांचा ओबीसीकरणाचा मार्ग सुकर होणार असल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Translate

माझ्याबद्दल