( नेवासा प्रतिनिधी ) :- नेवाशात काँग्रेस पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत या निवडणुकीच्या तयारीसाठी पक्ष पातळीवर बैठका सुरु झाल्या आहेत.नुकत्याच काँग्रेस पक्षाच्या झालेल्या जिल्हा स्तरीय बैठकीत नेवासा काँग्रेस पूर्ण ताकतीने स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी मांडले. नेवासा तालुक्यात जिल्हापरिषदेचे सात गट व पंचायत समितीचे चौदा गण या एकवीस जागा लढविण्याची तयारी पक्षाची असून नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासह सतरा जागा लढविण्याची तयारी काँग्रेसची असल्याचे मत माळवदे यांनी स्पष्ट केले. यासाठी लवकरच इच्छुक उमेदवाराच्या मुलाकती घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून सामान्य कार्यकर्त्यास संधी मिळाली पाहिजे इतर पक्षांच्या आघाडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यावर नेहमी अन्याय होत आला आहे. इतर पक्षाशी केलेल्या आघाडीमुळे काँग्रेसची राष्ट्रीय ओळख संपुष्टात आल्याचे मत माळवदे यांनी मांडले. येत्या दोन दिवसात काँग्रेस पक्ष निरीक्षकांची नेवाशांत बैठक होणार असून त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते पूर्ण तयारीला लागतील अशी माहिती माळवदे यांनी दिली.
"नगरपंचायतवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार"गेल्या पाच वर्षात नेवासा शहरात काँग्रेस पक्षाने नागरिकांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवून अनेक प्रश्न सोडविले उत्कृष्ट पक्ष संघटन बांधणी केली. सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेत काम केले. यापुढेही नागरिकांना न्याय देणार. येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील. नगराध्यक्ष हा काँग्रेसचाच होईल. नेवासा नगरपंचायतवर काँग्रेसचा झेंडा फडकणार - अंजुम पटेल शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी."पंचायत समितीवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार"काँग्रेस पक्षाची स्थानिकस्वराज्य संस्थेच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याची पूर्ण तयारी आहे. लवकरच इच्छुकांच्या मुलाकती घेण्यात येणार आहेत. यानिमित्ताने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात येण्याची संधी निर्माण करून देण्यात येईल. जनतेचा वाढता कल पाहता पंचायत समितीवर देखील काँग्रेसचा झेंडा फडकला जाईल.- संभाजी माळवदे,अध्यक्ष काँग्रेस कमिटी.
Post a Comment